छत्रपती शिवाजी महाराजांचे गुण विद्यार्थ्यांनी अंगीकारावे : ताटपल्लिवार

209

– अनुदानीत आश्रमशाळा जपतलाई येथे शिवजयंती साजरी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २१ फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजानी अतिशय बिकट परिस्थितीत मुघलांशी सामना करताना गमिणी काव्याचा अंगीकार करुण हिंदवि स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्याकडे असलेले व्यक्तीमत्व, धाडस, नियोजन, कठीण परिस्थितीतुन मार्ग कसा काढावा याचे अचूक ज्ञान त्यांच्याकडे होते. म्हणून ते रयतेचे राजे होते. त्यांचे गुण शालेय विद्यार्थ्यांनी अंगिकारावे असे मत आश्रम शाळेचे मुख्याध्यापक पि.व्हि ताटपल्लिवार यांनी काढले. ते अनुदानीत आश्रमशाळा जपतलाई येथील आश्रम शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली यावेळी अध्यक्ष पदावरुण बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पि.बि.रंहागडाले, राखडे, मिटपल्लिवार, दंडिकवार, खोब्रागडे आदि मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला फुलांची माळ टाकून दिप प्रज्वलित करुण कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवनावर प्रकाश टाकण्यात आला. बि.आर.भोयर शिक्षक यांनी कार्यक्रमाचे संचालन तर आभार बि.डी.चिलमवार मँडम यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्वच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. शेवटी जय जय महाराज माझा या गिताने कार्यक्रमाची सांगता काण्यात आली.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (International Mother Language Day) (Saudi Arabia) (Ind vs Ire Women’s) (Cheteshwar Pujara) (Ligue 1) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here