रांगी येथे शिवजयंती उत्साहात साजरी

165

– ध्वजारोहण करून बाईक रॅली
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २१ फेब्रुवारी : तालुक्यातील रांगी येथे काल १९ फेब्रुवारी ला शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सरपंचा फालेश्वरी प्रदिप गेडाम यांचे हस्ते ध्वजारोहण करून फेरी काढण्यात आली.
रांगी व नविरांगी येथील दोन्ही चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्या झेंड्याचे ध्वजारोहण रांगी येथील सरपंचा सौ.फालेश्वरी प्रदिप गेडाम यांचे हस्ते करण्यात आले. विधिवत शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दोन्ही गावात बाईक रॅली काढण्यात आली. यात रांगी येथील तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशिराम भुरसे, ग्रामपंचायत सदस्य राकेश कोराम, दिनेश चापडे, माजी सैनिक किसन आळे, माजी उपसरपंच नरेंद्र भुरसे, दिवाकर भोयर उपाध्यक्ष धानोरा तालुका पत्रकार संघ, ठुमराज कुकडकार, नितिन कावळे, परसराम जुवारे, मनोहर रोहनकार, गोपाळाजी रोहनकार, प्रदिप गेडाम सौ.पुनम कावळे, आदि मान्यवर उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यक्रमाला गावातील तरुण युवक महिला मुलं मुले व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (International Mother Language Day) (Saudi Arabia) (Ind vs Ire Women’s) (Cheteshwar Pujara) (Ligue 1) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here