धानोरा येथील जे.एस.पी.एम महाविद्यालयाचे वुशू स्पर्धेत सुयश

333

The गडविश्व
ता. प्रा / धानोरा, २० फेब्रुवारी : मनोहारी, चंदिगड विद्यापीठ द्वारा आयोजीत ७ ते ११ फेब्रुवारी दरम्यान संपन्न झालेल्या आंतर विद्यापीठ वुशू स्पर्धेत धानोरा येथील श्री.जीवनराव सीताराम पाटील मुनघाटे महाविद्यालयातील एम.ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी शुभम चव्हाण याने या स्पर्धेत कास्य पदक पटकावीले तसेच प्राची बडोदे या विद्यार्थीनीने वुशू स्पर्धेत सहभाग घेतला.
सदर खेळाडूने प्रत्यक्ष सहभाग घेवून विजयी घोडदौड कायम ठेवली. या नेत्रदिपक कामगिरीबद्दल श्री. साईबाबा ग्रामीण विकास संस्थेच्या अध्यक्ष श्रीमती शालिनीताई रमेशचंद्र मुनघाटे, कार्याध्यक्ष सौ.आशीताई रोहनकर, सचिव सौ. मीनलताई सहानी, सहसचिव सौरभदादा मुनघाटे, तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी , शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख प्रा .डॉ. संजय मुरकुटे, प्राचार्य डॉ. पंकज चव्हाण, सर्व प्राध्यापक वृंद तसेच प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Cheteshwar Pujara) (Kartik Aaryan Shehzada) (Somvati Amavasya 2023) (Goa) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here