धानोरा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

93

The गडविश्व
गडचिरोली, २१ फेब्रुवारी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक ‍ प्रशिक्षण संस्था, धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, धानोरा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
सदर रोजगार मेळाव्यामध्ये एस. आय. एस. हैद्राबाद आणि एम १ सेक्यूरीटी & अलाइड सर्व्हिसेस प्रा.लि.नागपूर या कंपनी उपस्थित असणारअसून सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा, शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था, धानोरा येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाने आवाहन केले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (International Mother Language Day) (Saudi Arabia) (Ind vs Ire Women’s) (Cheteshwar Pujara) (Ligue 1) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here