भामरागड शहरातील अवैद्य दारू विक्री बंद करा

252

– महिला शहर संघटनेची मागणी
The गडविश्व
गडचिरोली, १३ डिसेंबर : भामरागड शहरातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी शहर संघटनेच्या महिलांनी पोलिस विभागाकडे केली आहे. सोबतच शहरातील दारूविक्रेत्यांची यादीही देण्यात आली.
भामरागड शहरात येणाऱ्या १७ पैकी काही वार्डात मागील काही महिन्यापासून अवैद्य दारू विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे भामरागड मधील वातावरण दुषित होत जात आहे. शहरातील युवक व महिला दारूचा व्यवसाय करू लागले आहे. परिणामी घरात भांडण, युवकात दारूच पिण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे समाजातील युवा पीडी व्यसनाधीन होत चालली आहे. त्यामुळे शहरातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर रीतसर कार्यवाही करून परत एकदा भामरागडला अवैध दारूविक्रीमुक्त करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी दारूविक्रेत्यांची यादीही पोलिस विभागास सादर करण्यात आली असता, आपण विक्रेत्यांवर कारवाई करू अशी ग्वाही पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी शहर संघटनेचे अध्यक्ष भारती इष्टाम, नगरपंचायत अध्यक्ष रामबाई महाका, नंदाताई नारनवरे, निर्मला सडमेक यशोदा पुंगाटी, नगर सेविका सचीरेखा आत्राम, लक्षमी आत्राम व मुक्तीपथ टीम उपस्थित होती.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Zika virus) (Muktipath)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here