मंत्री चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपदावरून पायउतार करून कारवाई करा

179

– सावली तालुक्यातील फुले,शाहू, आंबेडकर विचारवादी समाजातर्फे निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता. प्र / सावली, १३ डिसेंबर : महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पैठण येथील सभेत महाराष्ट्राचे दैवत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील या महापुरुषांनी त्या काळामध्ये लोकांना भीक मागून शाळा चालवीत होते असे अपमानास्पद व्यक्तव करून या महापुरुषांचा अपमान केलेला आहे. त्या विरोधात सावली तालुक्यातील फुले, शाहू, आंबेडकर विचारवादी समाजातर्फे सोमवार १२ नोव्हेंबर रोजी सावली येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर निषेध व्यक्त करून तहसीलदार सावली यांचे मार्फतीने राष्ट्रपती तथा राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन देऊन चंद्रकांत पाटील यांना मंत्रीपदावरून पाय उतार करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी निवेदनातून मागणी काण्यात आली आहे.
यावेळेस सावली तालुक्यातील बहुजन आयोजक कार्यकर्ते अनिल गुरनुले, सभापती नितेश रस्से, नगरसदस्य प्रीतम गेडाम, यांच्यासह तालुकाध्यक्ष नितीन गोहने, माजी सभापती विजय कोरेवार, माजी उपनगराध्यक्ष भोगेश्वर मोहुरले, नगरसदस्य अंतबोध बोरकर, नगराध्यक्ष लताताई लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकर, नगरसदस्या अंजली देवगडे, सदस्य ज्योती शिंदे, सदस्य ज्योती गेडाम, सदस्य साधनाताई वाढई, शहराध्यक्ष भारती चौधरी, नगरसदस्य राधा ताटकोंडावार, सदस्य गुणवंत सुरमवार, चंद्रकांत गेडाम, सदस्य प्रफुल वाळके, किशोर घोटेकर, नगरसदय विजय मुत्तेलवार, मोहन गाडेवार, दिलीप लटारे, सुनील पाल, सदस्य सचिन संगिडवार, आशिष मनबतुलवार, किशोर कारडे, सचिन इंगुलवार, मेहबूब पठाण मनोज चौधरी, सुनील ढोले, महेश मांदाडे, महेश गुरनुले, रवि वाढई, सुरज आवळे, मिलिंद शिंदे, संगीता चटारे, किरण वाढई, किरण रस्से, पायल प्रधाने, पूर्वा प्रधाने, विशाखा ठाकरे, नूतन मोहूर्ले आणि इतर तालुक्यातील सर्व बहुजनवादी कार्यकर्ते उपस्थित होते.

(The Gadvishva) (Chandrapur) (Take action by removing Minister Chandrakant Patil from the post of Minister)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here