The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १४ डिसेंबर : तालुक्यातील प्रथम क्रमांकावर असलेले ग्रामपंचायत मुरुमगाव येथे मंगळवार १३ डिसेंबर ला साहाय्यक संचालक डॉ. कमलापूरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव ला भेट देऊन परिपूर्ण माहिती घेतली.
१ ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान मिशन मलेरिया सुरू असल्याबद्दल सहाय्यक संचालक डॉ.कमलापूरकर यांनी परिपूर्ण माहिती घेतली व सविस्तर निरिक्षण करुन कामकाज समाधान कारक आढळले असता पूढील कार्याकरिता शुभेछा दिल्या.
या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. राहूल बनसोड प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुमगाव, साहाय्यक संचालक हिवताप डाॅ. निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. मोडक व प्राथमिक आरोग्य केंद्रातील संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होते.
