धक्कादायक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षावर गोळीबार…आणि…

1668

– शहरात खळबळ, हल्ल्याने विविध प्रश्नांना उधाण
The गडविश्व
मूल, १२ मे : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर ११ मे रोजी रात्रोच्या सुमारास अज्ञाताने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना मूल शहरात घडली. सदर घटनेने शहरात एकचं खळबळ उडाली असून या घटनेत संतोष रावत यांच्या हाताला गोळी घासून गेली. याप्रकरणी मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे कळते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत हे ११ मे रोजी मूल येथील शाखेत आपल्या कार्यकर्त्यासह बसुन होते दरम्यान रात्रो ०९.३० वाजताच्या सुमारास ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता एका कार मधुन बुरखाधारी अज्ञात इसमाने त्यांच्यावर गोळीबार केला यात संतोष रावत यांच्या हाताला गोळी घासून गेल्याने ते जखमी झाले. यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कार पकडण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोर कार घेवुन पळुन जाण्यास ते यशस्वी झाले. दरम्यान संतोष रावत यांना मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करिता नेण्यात आले आहे. रावत यांच्यावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अद्याप तरी गुलदस्तात असून सदर घटनेने शहरात एकचं खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे तर हा हल्ला का करण्यात आला ? संतोष रावत हे एका पक्षाचे नेते असून हा हल्ला राजकीय द्वेषातून तर करण्यात आला नाही ना ? असे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

(the gdv, the gadvishva, chandrapur mul , ssntosh ravat)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here