गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शशिकांत साळवे तर उपसभापतीपदी बळवंत लाकडे

670

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ मे : धानोरा तालुका भाजपाध्यक्ष शशिकांत विठ्ठलराव साळवे यांची गडचिरोली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी तर बळवंत लाकडे यांची उपसभापतीपदी बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीने ज्येष्ठ नेते तथा सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार आणि प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांच्या नेतृत्वात कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीची निवडणूक लढविली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे १८ संचालक असून १७ संचालकांची निवडणुक पार पडली. १२ मे रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोलीच्या सभापती पदाची निवडणुक झाली. त्यात भारतीय जनता पार्टीच्यावतीने शशिकांत विठ्ठलराव साळवे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. त्यात ते अविरोध निवडून आले. तर उपसभापती पदासाठी डॉ. बळवंत लाकडे यांचाही एकच उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची अविरोध निवड झाली.
शशिकांत साळवे व डॉ. बळवंत लाकडे यांची अविरोध निवड झाल्याबद्दल सहकार महर्षी अरविंद सावकार पोरडीवार, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्रकाश सावकार पोरेड्डीवार, को-ऑपरेटीव्ह बँकेचे मानद सचिव अनंत साळवे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त संचालक संजय पोरेड्डीवार, लक्ष्मीकांत कुंभारे, विनायक भोयर, रामदास पिपरे, सोमा करकाडे, बापुजी फरांडे, विजयालक्ष्मी जंबेवार, रेखा चुधरी, नरेंद्र उईके, हेमंत बोरकुटे, मुखरु लाडवे, पवन येरमे, नंदकिशोर सारडा, दिलीप भुरले, वामन घोगरे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, डॉ. दुर्गेश भोयर, सरपंच फालेश्वरी गेडाम, माजी सरपंच नरेंद्र भुरसे, दिवाकर भोयर, श्रावण देशपांडे, माजी सरपंच जगदिश कन्नाके, हेमंत जंबेवार, राजेंद्र साळवे, अनिल पोहणकर, दादाजी चुधरी, दिलीप धात्रक आदींनी अभिनंदन केले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून हेमंत सव्वालाखे यांनी काम पाहिले.

(the gdv, the gadvishva, dhanora, gadchiroli, crime news, gadchiroli news updates, krishi utpann bajar samiti election, Shashikant Salve as Chairman of Gadchiroli Agricultural Produce Market Committee and Balwant Lakde as Deputy Chairman)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here