– मृतकात तीन महिलांचा समावेश, परिसरात खळबळ
The गडविश्व
सुकमा, दि. १६ : छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून पाच जणांची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण पसरले आहेत
मौसम कन्ना (३४) मौसम बिरी हे पती-पत्नी आणि मौसम बुच्चा (३४) व त्याची पत्नी मौसम आरजू (३२) त्याचबरोबर करका लच्छी (४३) अशी मृतकांची नावे आहेत.
सुकमा जिल्ह्यातील आदिवासीबहुल इटकाल गावामध्ये जादूटोणा केल्याच्या संशयातून ३ महिलांसह दोन पुरुषांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत पाचही जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरताच भीतीचे वातावरण पसरले आहे. तर याप्रकरणी पोलिसांनी सवलम राजेश, सवलम हिडमा, करम सत्यम, कुंजम मुकेश आणि पोडियाम एंका यांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #cgpolice #crimenews )