The गडविश्व
गडचिरोली, २१ फेब्रुवारी : महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, आष्टी येथे १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान आयोजीत ५० व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली च्या विद्यार्थिनींची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीकरीता निवड झाली आहे.
यामध्ये कु. सोनाली कर्मवीर नैताम व कु. योमीनी नामदेव तोरेम यांनी खुल्या प्रवर्गातुन माध्यमिक विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. तसेच विज्ञान प्रदर्शनीमध्ये घेण्यात आलेल्या विज्ञान प्रश्नमंजुषामध्ये कु. सोनाली नैताम हिने द्वितीय क्रमांक पटकाविला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आला.
शाळेचे विज्ञान शिक्षक विलास मडावी यांच्या मार्गदर्शनात वाहतुक व तंत्रज्ञान या विषयामध्ये वॉटर लिफ्टींग ब्रीज ही वैज्ञानिक प्रतीकृती सादर केली. ही प्रतीकृती शेतकऱ्यांच्या शेतीला पुलाच्या माध्यमातुन पाणीपुरवठा करण्यास उपयोगी पडेल. विद्यार्थीनींनी यशाचे श्रेय मार्गदर्शक विलास मडावी व शाळेची मुख्याध्यापिका कु. दिपा जुमनाके यांना दिले. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीसाठी शुभेच्छा दिल्या.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (International Mother Language Day) (Saudi Arabia) (Ind vs Ire Women’s) (Cheteshwar Pujara) (Ligue 1) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)