गडचिरोली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचे राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत सुयश

112

The गडविश्व
गडचिरोली, २१ फेब्रुवारी : आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील मुला मुलींच्या नाशिक येथील राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा, गडचिरोली विद्यार्थिनींनी सुयश प्राप्त केले आहे.
कु. खुशबु आतला या विद्यार्थीनीने लांब उडी खेळामध्ये सुवर्ण पदक, कु. संध्या उसेंडी विद्यार्थीनीने गोळाफेक खेळामध्ये सुवर्ण पदक, कु. हर्षदा उसेंडी विद्यार्थीनीने व्हॉलीबॉल खेळामध्ये रौप्य पदक व कु. अनुष्का शामराव पुडो विद्यार्थीनीने ३००० मिटर चालने या खेळप्रकारात कास्य पदक पटकाविले आहे.
सदर विद्यार्थीनींचा शाळेमध्ये सत्कार करण्यात आला असून विद्यार्थीनींनी यशाचे श्रेय मुख्याध्यापिका कु. दिपा, क्रीडा शिक्षक आशिष नंदनवार यांना दिले. तसेच सर्व कर्मचाऱ्यांनी सदर खेळाडु विद्यार्थीनीना शुभेच्छा दिल्या.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (International Mother Language Day) (Saudi Arabia) (Ind vs Ire Women’s) (Cheteshwar Pujara) (Ligue 1) (The Last of Us episode 6) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (The Gdv)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here