शिवाजी विद्यालयात डिजिटल ईव्हीएमद्वारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना

17

शिवाजी विद्यालयात डिजिटल ईव्हीएमद्वारे शालेय मंत्रिमंडळाची स्थापना
– लोकशाही प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव, उत्साहात पार पडली निवडणूक व शपथविधी प्रक्रिया
The गडविश्व
ता. प्र/ कुरखेडा, दि. १ : स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली. भारताच्या लोकशाही शासन व्यवस्थेची मूल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजावीत आणि निवडणूक प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना मिळावा, या उद्देशाने डिजिटल ईव्हीएम मशीनद्वारे मतदान घेऊन मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.
विद्यालयात सार्वत्रिक निवडणुकीच्या धर्तीवर निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. विद्यार्थ्यांनी डिजिटल ईव्हीएम मशीनचा वापर करून आपल्या पसंतीच्या उमेदवारांना मतदान केले. निवडणूक प्रक्रिया आणि नवनिर्वाचित मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा प्राचार्य संघमित्रा कांबळे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
निवडणुकीत युगल जांभुळकर यांची शालेय मुख्यमंत्री, जुनेद शेख यांची उपमुख्यमंत्री, सोहम पाटील यांची सांस्कृतिक मंत्री, खुशबू सोनवाणे यांची आरोग्य मंत्री, शिवानी कवडो यांची क्रीडामंत्री, भविष्य सहारे यांची सहल व परिवहन मंत्री, दक्षत शेंडे यांची शिक्षण मंत्री, तर समृद्धी दरवडे यांची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड झाली.
दरम्यान, हुमदेवीं मेश्राम यांची उपसांस्कृतिक मंत्री, ईशांत मानकर यांची उपक्रीडा मंत्री आणि आराध्या नाकतोडे यांची स्वच्छता मंत्रीपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडणूक प्रक्रियेत बहुसंख्य विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाला प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे संचालन लिकेश कोडापे यांनी केले, तर चंद्रकांत नरुले यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here