‘त्या’ नादुरुस्त ट्रॅक्टरला दुचाकी व चारचाकी वाहन धडकले, एकाचा मृत्यू तर पाचपेक्षा अधिक जखमी

1224

– गडचिरोली- मूल मार्ग बनत आहे अपघाताचे मार्ग
The गडविश्व
ता. प्र / सावली, १६ डिसेंबर : चंद्रपूर – गडचिरोली महामार्गावरील व्याहाड (बुज) जवळ असलेल्या नादुरूस्त ट्रॅक्टर ला अर्ध्या तासाच्या आत दोन वाहने धडकल्याने झालेल्या अपघात एकाचा मृत्यू तर सात जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार १६ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, MH 35 G 7665 क्रमांकाची नादुरुस्त ट्रॅक्टर व्याहाड (बूज) नजीक उभी होती. दरम्यान खुशाल माणिक वासेकर (३५) हा MH 34 BY 6141 क्रमांकाच्या दुचाकीने गडचिरोलीला कामाला जात असायचा आणि सायंकाळला गडचिरोली वरून गावाकडे येत असताना नंदिनी बार व्याहाड (बूज) जवळ उभ्या नादुरुस्त ट्रॅक्टरला धडक देऊन झालेल्या अपघातात त्याच्या डोक्याला जबर मार बसल्याने जागेवरच मृत्यु झाला.
तर दुसरा अपघात त्याच ट्रॅक्टरला अर्ध्या तासाने गडचिरोली वरून मुलकडे जाणारी MH 21 AH 7717 क्रमांककाच्या स्कार्पिओ वाहनाने धडक दिली असता त्या वाहनात असलेले सात प्रवासी जखमी झाले असुन त्यापैकी चार जणांना गडचिरोली येथील दवाखान्यात हलवण्यात आले तर दोघांची प्रकृती चिंताजनक असल्यामूळे त्यांना नागपूरला हलविण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे.
या मार्गावर आतापर्यंत अनेक अपघात घडले असून सदर अपघाताने मात्र हा मार्ग अपघाताचे प्रवनस्थळ ठरत ठरत असल्याचे बोलल्या जात आहे.

(The Gadvishva) (Road Accident) (Tractor) (Govinda Naam Mera) (Shubman Gill) ÷Hindustan Times) ( Vyahad tractor news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here