नायलॉन मांजात अडकलेल्या घुबडाला जीवनदान

195

– आर.आर.टी सदस्यांनी केली कामगिरी
The गडविश्व
गडचिरोली, ४, जुलै : येथील चामोर्शी मार्गावरील एका झाडाला नायलॉन मांज्यात अडकलेल्या घुबड पक्षाला आर.आर.टी. सदस्यांनी जीवनदान दिले.
नायलॉन मांजावर बंदी असतांना सुद्धा छुप्या मार्गाने त्याची विक्री केली जाते तसेच पतंग उडविणारे हौशी त्याचा वापरही करतात. नायलॉन मांज्यामुळे विविध घटना घडल्या आहेत यात मनुष्याला सुद्धा हानी पोहचली आहे त्यात कुणाचा प्रवास करतातना गळा चिरला, काही लहान मोठे अपघात सुद्धा झाले त्याचप्रमाणे पशु, पक्षी यांना सुद्धा इजा झाली आहे.
गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावरील एका झाडाला घुबड पक्षी अडकून असल्याची माहिती वनविभागाला मिळताच जलद बचाव पथकाच्या सदस्यांनी लगेच झाडावर चढून मांज्या कापून घुबडाला सुखरूप खाली उतरविले जंगलात सुरक्षित रित्या सोडले. नायलॉन मांज्यामुळे पशु पक्षांसह मानवाला इजा होतात त्यामुळे नायलॉन मांज्याचा वापर करू नये असे आवाहन वन विभागाने केले आहे.
सदर मोहीम उपवनसंरक्षक मीलिष शर्मा यांच्या मार्गदर्शनात पार पाडण्यात आली. यावेळी सहाय्यक वन संवरक्षक सोनल भडके, जलद बचाव सदस्य अजय कुकडकर , मकसुद सय्यद, पंकज फरकाडे, गुणवंत बाबनवाडे, निखिल बारसागडे, सागर निमगडे, साहिल चीप्रोजवार, यादनिक बांबोडे, मृदंग जूनघरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here