The गडविश्व
गडचिरोली, दि. ०९ : लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्षाचे उमेदवार आहेत. निवडून येण्यासाठी मतदारांना दारूचे प्रलोभन दाखविण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद असलेल्या गावांमध्ये सुद्धा अवैध व्यवसाय सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्हाभरात मुक्तिपथतर्फे दारूमुक्त निवडणूक अभियान राबविण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाभरातील गावागावात बैठका घेऊन मतदारांना जागृत केले जात आहे.
जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर वसल्या सिरोंचा तालुक्यातील नगरम , चिंतरपल्ली, मद्दीकुंठा, जानमपल्ली चेक, जानमपल्ली डब्ल्यूएल, रामनजापुर, भोगापूर, कारसपल्ली, अमरावती, कोटामाल, वियमपल्ली, रायपेठा, कोणपॅच, पोचमपल्ली, कोटा, पोचमपल्ली, माणिक्यपूर, रामजापूर टोला या गावांमध्ये लोकसभा निवडणूक दारूमुक्त करण्याचा ठराव पारित करण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यातील आरसोडा,जोगिसाखरा, पाथरगोटा, चुरमुरा, किटाळी,शिवनी बूज व आरमोरी शहरातील बाजारपेठ, डोंगरी या 2 वार्डात दारूमुक्त निवडणुक सभा घेवून ठराव संमत केले. देसाईगंज शहरातील तुळशी , विहीरगाव, कोंढाळा, गांधीनगर, पिंपळगाव, कीन्हाला, कुरूड, भगतसिंह वॉर्ड, हेटी वॉर्ड, विर्शिवार्ड, कमला नगर, सिंधी मोहल्ला या गावांमध्ये सुद्धा ठराव पारित करण्यात आले आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath)