The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील रांगी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळेत सन 2023-24 या शालेय सत्रा करिता नव्याने शालेय मंत्रिमंडळाची निवड करण्यात आली.
शालेय विद्यार्थ्यांची मतदान यादी तयार करून मतदानाचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवार म्हणून 20 विद्यार्थी नाम निर्देश पत्र भरुन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी मतदान करुन मतदानाचा आनंद घेतला. त्याप्रसंगी मतदान पेटी व निवडणूक अधिकारी म्हणून शाळेमधील शिक्षिका चांगले मॅडम, जंगी सर, सयाम् मॅडम आणि दोडके सर यांनी काम बघितले. शाळेचे मुख्याध्यापक काटेंगे सर व पदवीधर शिक्षक परशुराम कर सर यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली.