धानोरा तालुका ग्रा.पं. कर्मचारी संघटनेची नविन कार्यकारणी गठित

169

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २८ ऑगस्ट : तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी (रजिस्ट्रेशन नं ४५११) संघटनेची सभा रविवार 27 ऑगस्ट 2023 रोजी 12.00 वाजता ग्रामपंचायत सालेभट्टी सभागृहात मारुती फुलेवार जिल्हा अध्यक्ष गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .
या सभेला शालिकराव पदा जिल्हा उपाध्यक्ष गडचिरोली उपस्थित होते. यावेळी धानोरा तालुक्याची ग्रामपंचायत कर्मचारी संघटना ४५११ नवीन कार्यकारणी गठित करून अनेक विषयावर चर्चा करण्यात आली. सभेला एकूण 54 कर्मचारी उपस्थित होते.
नवीन कार्यकरणीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर जी. शेंडे, उपाध्यक्ष गुरुदासजी व तालुका सचिव उमेश कुमार तुलावी ,सहसचिव मनीराम गावडे व संघटक नितीन वासेकर , कार्याध्यक्ष नामदेव बैस व सदस्य पंकज गेडाम व इतराची निवड करण्यात आली.सभेला तालुक्यातील एकूण 54 कर्मचारी उपस्थित होते .
यावेळी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक तसेच सामुदायिक समस्या संघटनेतर्फे जाणून घेतले. त्यानंतर कर्मचाऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाचे संचालक म्हणून उमेश तुलावी यांनी केले तर आभार पंकज यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुधीर पद्दा, लोशन मडावी,ज्योती मडावी, प्रिय दुग्गा, ब्रिजलाल मडावी, शेषराव नैताम, सुखदेव हलामी, अमित सिंपी, शंकर एक्का, पार्वती गडपयाले व तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here