– थातूरमातूर कामाचा फटका
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २२ : तालुक्यातील रांगी परिसरातील १५ ते २० हजार नागरिकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी रांगी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले. मात्र सदर आरोग्य केंद्रातील टीप – टीप पाणी पडत असल्याने मात्र याचा नाहक त्रास रुग्णांना सोसावा लागतो आहे.
सुरुवातीला साधी कवेलुची इमारत आरोग्य केंद्राला होती. त्यावरती थातूरमातूरस्लॅब टाकण्यात आले होते. तेव्हा पासून आजतागायत त्याच इमारतीत ओपिडी, प्रशासनाचे काम चालवत आहे. ३५ ते ४० वर्षापासून असलेल्या आरोग्य केंद्राची आजतागायत नव्याने इमारत बांधकाम करणे आवश्यक असतानाही नव्याने इमारत बांधण्यात आली नसल्याने सध्या असलेली ही इमारत धोकादायक असताना देखील सरकार रुग्णांशी आणि डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या जिवनाशी खेळत तर नाही अशी शंका निर्माण झालेली आहे. याबाबत वृत्त प्रकाशित झाल्यानंतर प्रशासनाची हालचाल सुरू झाली आणि इमारतीवर असलेल्या स्लॅब ची डागडुजी करून शासनाने काय सिद्ध केले असा प्रश्न गावकरी विचारीत आहेत.
धानोरा तालुक्या पासुन १८ कि.मी.अंतरावर रांगी गाव आहे.वयाच गावाला गडचिरोली, आरमोरी, तालुक्याच्या सिमा जोडलेल्या आहेत. येथील बांधकाम करण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही अतिशय जुनी आहे. सदर इमारतीच्या भिंतीला पडलेल्या भेगा बुजविण्यात आल्या. वरच्या इमारतीचा स्लॅबमधुन पाणी गळत आहे. स्लॅबचे सिमेंटचे छोटे छोटे तुकडे जमिनीवर पडलेले दिसतात. एखाद्या रुग्णांच्या शरीरावर सिमेंटचे खिपले पडुन इजा झाल्यास जबाबदार कोण ? सतत पडलेल्या पावसामुळे पावसाळ्यात पाणी गळती होत असताना इमारतीत काम करणे सर्वाँना धोकादायक आहे. अशा इमारतीमधुन प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चालत असल्याने ते रुग्णांकरिता व कर्मचाऱ्यांकरिता धोकादायक असल्याने सदर इमारतीचे निर्लेखन करुन नव्याने बांधकाम करणे गरजेचे आहे. इमारतीच्या आत बसायला जागा मिळत नाही. पुर्ण ठिकाणी पाणी गळत असते. जी इमारत धोकादायक आहे त्या इमारतीच्या परिसरात लिपिकाचे साहीत्य ठेवायला जागा नाही. जुन्या कवेलुच्या इमारतीवर स्लॅब टाकलेले आहे. त्यावर लेप टाकले असल्याने वजन धरनार नाही. या बाबीची शहानिशा सरकारने केली का नाही ? असा प्रश्न लोक विचारीत आहेत.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत ३५ ते ४० वर्ष जुनी असून परिसरातील १५ ते१८ गावांचा कारभार चालतो. सध्यातरी सदर इमारत निकामी असायला हवी. जेने करुन त्यापासून धोका होणार नाही. सदर इमारतीच्या बाबतीत भितिचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्याची परिस्थिती अतिशय नाजूक असून भर पावसाळ्यात जागोजागी पाणी गळत असल्याने कर्मचाऱ्यांना बसणे आणि काम करणेही कठीण झालेले आहे त्यामुळे सदर इमारत नव्याने नियोजन करून बांधकाम करण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora #rangi)