– पूर्णवेळ डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. ३० : तालुक्यातील रांगी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरचे दोन पदे असुन सध्या स्थितीत येथील कारभार प्रभारी डॉक्टरच्या भरवश्यावर चालत असल्याचे चित्र आहे. मोहली उपकेंद्र येथील डॉ. सिंग यांच्याकडे रांगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रभार असल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णालयतील रुग्णांकडे दुर्लक्ष होत आहे. तर गरोदर माता, ओपीडी, प्रशासकीय काम करणे आवाक्याबाहेर जात असल्याने त्वरित डॉक्टर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी रांगी चे माजी सरपंच नरेंद्र भुरसे यांनी केली आहे.
रांगी गाव परिसरात केंद्र असून परिसरातील १० ते१२ गावातील लोकांच्या आरोग्याची जबाबदारी रांगी आरोग्य केंद्रावर असुनही येथे स्थायी डॉक्टर नाही हे दुर्दैव आहे.
येथील आरोग्य केंद्राला एकूण तिन पदे असुन यापैकी एक पद मोहली उपकेंद्रा साठी आहे. मोहली येथे डॉ.
सिंग ह्या कार्यरत आहेत. रांगी येथील दोन्ही पदे रिक्त असल्याने येथील वैद्यकीय अधिकारी अभावी रुग्णालय वाऱ्यावर असल्याचे पहायला मिळते. येथील रुग्णांची होणारी हेळसांड थांबविण्यासाठी येथील रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी केली आहे. सध्या रांगी येथील आरोग्य केंद्राचा संपूर्ण भार डॉ. सिंग ह्या सांभाळत आहेत. त्यांनी कोण कोणता भार सांभाळावे असा प्रश्न निर्माण होत असुन येथे पुर्णवेळ डॉक्टर आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यात आली. येथिल दवाखान्यात तीन डॉक्टरची पदे मंजूर आहेत त्यांपैकी एक डॉक्टर मोहली उपकेंद्राला आहेत. दोन डॉक्टर ची पदे रांगी करीता आहेत. एक पद श्रेणी १ चे एमबीबीएस तर दुसरे पद बिएएमएस आहे. श्रेणी १ चे डॉक्टर म्हणून ताराम कार्यरत होते ते MD साठी गेल्याने ते पद खाली झाले आहे. दुसरे पद सुद्धा रिकामेच असल्याने सध्या दवाखान्यात डॉक्टर नाहीत. जे आहेत डॉक्टर सिंग असुन त्या स्त्री असुन त्या बिएमएस आहेत गट ब मधे मोडतात. त्यामुळे दवाखान्याचा संपूर्ण भार गट ब च्या खांद्यावर चालतांना दिसतो. येथिल समस्या लक्षात घेऊन त्वरित डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी माजी उपसरपंच नरेंद्र भुरसे यांनी केली आहे.