गेवर्धा तंटामुक्ती समिती पदी राजू बाराई यांची चौथ्यांदा निवड

65

The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा (चेतन गहाने) दि. १० : तालुक्यातील गेवर्धा तंटामुक्ति समिती पदी राजू बाराई यांची चौथ्यांदा निवडबकरण्यात आली.
गेवर्धा येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये गट ग्रामपंचायत ची संयुक्त ग्राम पार पडली. या सभेमध्ये विविध विकास कामांवर चर्चा करून ठराव पारीत करण्यात आले.यावेळी तंटामुक्ति समितीचे फेरनिवड करीत तंटामुक्ति समिती अध्यक्ष पदाकरीता दोन नाव सभेमध्ये आल्याने लोकशाही पद्धतिने मतदान करून निवड करण्यात आली.
सभेमध्ये सुचवलेल्या उमेदवार माधुरी नितिन शेन्डे यांना ३७ मत तर राजू बाराई यांना १५२ इतके मत मिळाल्याने सलग चौथ्यांदा राजू बाराई यांना विजय घोषित करण्यात आले.
या सर्व प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून कृष्णा मस्के, दिनेश कावळे, ज्ञानेश्वर मस्के, अमिता नहामुर्ते यांनी बघितली. या प्रसंगी विजयी उमेदवार राजू बारई यांना ग्राम पंचायत सरपंचा सुषमाताई मडावी व उपस्थित गावकऱ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन ग्राम पंचायत सभागृह गेवर्धा येथे शुभेच्छा देण्यात आले. विजय उमेदवार यांनी सर्व ग्रामसभेचे सभासद व पदाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

(#thegdv #thegadvishva #gadchirolilocalnews #gadchirolilocalnews #kurkheda #gevardha #gadchirolilocalnews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here