प्राथमिक आरोग्य केंद्र मुरूमगाव येथे नवीन एन.पी.एस पेन्शन योजनेचा निषेध

133

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०१ : मुरूमगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शासनाने ३१ ऑक्टोबर २००५ पासून बंद केलेल्या एन.पी.एस.पेन्शन योजनेचा काळ्या फीती लावून ३१ ऑक्टोबर २०२३ ला निषेध करण्यात आला.
शासनाने १८ वर्षापूर्वी बंद केलेली जुनी पेन्शन योजना सरसकट
लागू करावी व नवीन एम.पी.एस पेन्शन योजना बंद करावी असे आवाहन केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी राहुल बनसोड, आरोग्य सहाय्यक अजय नवघरे, औषध निर्माता अधिकारी विवेक मून, आरोग्य सेविका आसमवार, बर्डे, ठेसरकर, ठवरे, राठोड, आरोग्य सेवक विक्रम दडमल, संजय न्यालेवार, प्रांजल शेडमाके, शुभम उईके, संतदास नैताम, संजय आत्राम, मडावी, टेक्निशियन प्रशांत गोतमारे, परिचर मंगल सिंग देहारी, दीपक रगडे आदींनी काळ्या फिती लावून नवीन एम.पी.एस पेन्शन योजनेचा निषेध केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here