राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा दौरा रद्द

2689

– विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याकरिता प्रमुख पाहुणे म्हणून राहणार होते उपस्थितीत
The गडविश्व
वर्धा, २९ जून : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ४ ते ६ जुलै विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. मात्र आता त्यांचा ६ जुलै रोजीची दौरा रद्द झाल्याचे कळते. ६ जुलै रोजी वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यासाठी त्या प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार होत्या. तसेच सेवाग्राम आश्रमाला भेट देणार होत्या. मात्र आता त्यांचा दौरा वेळेवर रद्द झाल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
विद्यापीठाने हा दौरा रद्द झाल्याचे सांगितले मात्र त्यात कोणतेही स्पष्ट कारण नमूद नाहीत.

गडचिरोली येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थिती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ४ ते ६ जुलै दरम्यान विदर्भ दौऱ्यावर असून ५ जुलै रोजी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभ व प्रशासकीय इमारतीचा शिलाण्यास सोहळ्यास उपस्थित राहणार आहे. वर्धा येथील त्यांचा दौरा रद्द झाला असला तरी गडचिरोली येथील दौरा हा निश्चित असल्याचे समजते.

(President Draupadi Murmu’s visit cancelled, wardha, gadchiroli, nagpur)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here