The गडविश्व
गडचिरोली, २९ जून : राज्यातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात सेट २६ मार्च २०२३ रोजी घेण्यात आली. या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला असून गडचिरोली येथील अंकुश किशोर लिंगलवार यांनी भौतिकशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
अंकुश लिंगलवार यांनी सावित्री बाई फुले विद्यापीठ पुणे येथून भौतिकशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असून सध्या ते पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश मिळविल्याने सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या यशाबद्दल लेखिका स्वाधिनता बाळेकरमकर, वक्ते तुषार दुधबावरे यांनी अभिनंदन केले.
त्यांनी त्यांच्या यशाचे श्रेय आई- वडील, शिक्षक, मित्र, रामटेके सर आणि पडेकर सर यांना दिले.