The गडविश्व
ता.प्र / कूरखेडा, २९ जून : प्रचोधन डेव्हलपमेंट सर्विसेस व एसाफ सहकारी बँकेच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत संस्कार पब्लिक स्कुल कूरखेडा येथे बालज्योती बाल शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यात बालकाना योगा व्यायाम विविध खेळ, सामान्य ज्ञान, आर्थिक साक्षरता तसेच इतर विविध विषयावर मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.
सदर बाल शिबीराच्या उदघाटन प्रसंगी आम्ही आमच्या आरोग्यासाठी स्वंय सेवी संस्थेचा संयोजिका शूभदा देशमुख, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सिराज पठान, संस्कार पब्लिक स्कुलचे शिक्षिका शालू मडावी, एसाफ सहकारी बँकेचे डि.एम बालाजी शिंदे, वरिष्ठ व्यवस्थापक सामाजिक उपक्रम अमित दास, सि.एस.एम.अजय राणे, शाखा व्यवस्थापक उमेश दहिवलकर, सूमीत यादव, सागर जोशी उपस्थित होते.
दोन दिवसीय या बाल शिबीरात प्रशिक्षक म्हणून उदय पगडे व पुनम कूथे यांनी जबाबदारी पार पाडली. बालकांना आर्थिक साक्षरतेचे धडे अमित दास यांनी दिले. तर या शिबीरात ४४ बालके सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार सागर जोशी यांनी मानले.
(the gdv, kurkheda, the gadvishva, gadchiroli news updates, yoga)