-पत्रकार परिषदेत शिलू चिमूरकर यांचा आरोप
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. १८ : मागील दहा वर्षांत कुरखेडा व कोरची तालुक्यात प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधीच्या दूर्लक्षामूळे आरोग्य,रस्ते, विज तसेच शिक्षणाची दूरावस्था झाली आहे असा आरोप कुरखेडा येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शिलू चिमूरकर यांनी केला.
कुरखेडा तालुक्यात बुधवार पासून डॉ. चिमूरकर यांनी जनसंवाद परिवर्तन यात्रा सूरू केली आहे या निमीत्य येथे आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. चिमूरकर बोलत होत्या. यावेळी त्यांनी दोन्ही तालुक्यात ग्रामीण भागात आरोग्याची दुरावस्था याकडे लक्ष वेधले तसेच सती नदीचा खचलेल्या रपट्यामूळे व पर्यायी मार्गाचा दुरावस्थेमुळे दोन्ही तालुक्यातील नागरिकांना होणारा मानसिक व शारीरिक त्रास, कोरची तालुक्यात विजेचा लपंडावामुळे व कुरखेडा तालूक्यात कृषी पंपावरील भारनियमनाममुळे शेतकऱ्यांची होणारी अवदशा याकडे लक्ष वेधले. कुरखेडा सारख्या शहरात सार्वजनिक पाणी पुरवठा नळ योजनेतून गढूळ पाण्याचा पूरवठा होत आहे तसेच मानव विकास मिशन अंतर्गत विद्यार्थांकरीता राबविण्यात येणारी बस सेवा नियमीत व वेळेवर पोहचत नसल्याने विद्यार्थांचे शैक्षणिक नूकसान होत आहे असा आरोप सुद्धा यावेळी त्यांनी केला व याकरीता प्रशासन व स्थानिक निष्क्रिय लोकप्रतिनिधि जबाबदार असल्याचे सांगीतले.
पत्रकार परिषदेला काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष शोएब मस्तान, माजी आरोग्य व पाणी पूरवठा सभापती मनोज सिडाम, संदेश कोटागंले, युवक काँग्रेसचे पदाधिकारी पिंकू बावने आदि हजर होते.