पोलीस भरती अगोदरच भावी पोलिसांची पायपीट

1002

महाराष्ट्र विधानपरिषद थेट प्रक्षेपण (अर्थसंकल्पीय अधिवेशन, फेब्रुवारी-मार्च २०२३)

– आर्थिक भुर्दंडाचा करावा लागत आहे सामना, महाआयटीचा पोर्टल डाऊन
The गडविश्व
गडचिरोली, २४ नोव्हेंबर : महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार गृह विभागाच्या अधिपत्याखालील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई भरती ची पदे भरण्यासाठी केवळ ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरावयाची सुविधा फक्त policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

सदर ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता महाआयटी ला कंत्राट दिले आहे. मात्र पोलीस भरती अगोदरच भावी पोलिसांची पायपीट होतांना दिसत असून ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता असलेले संकेतस्थळ कधी काळी व्यवस्थित काम करीत नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ९ नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून ३० नोव्हेंबर पर्यंत अर्ज ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. अगदी सुरूवातीपासूनच ऑनलाईन अर्ज भरण्यास अडथळे निर्माण होत असल्याची अर्जदारांची ओरड आहे त्यामुळे अर्ज भरायचा तरी कसा ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गडचिरोली जिल्हयात अनेक भागात इंटरनेट सुविधेचा अभाव आहे. असे असतांना अर्जदार आपला ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता इंटनेट कॅफे मधे कधी तालुका स्थळी तर कधी जिल्हास्थळी धाव घेत आहे. मात्र तालुका व जिल्हास्थळी सुध्दा महाआयटीच्या तांत्रीक अडथळयामुळे दिवसभर ऑनलाईन अर्ज सादर करण्यास ताटकळत राहावे लागत आहे. दिवसभर तातकळत राहुनही ऑनलाईन अर्ज महाआयटीच्या तांत्रीक अडचणीमुळे न भरता घरी परतावे लागत आहे. याचा अधिकचा आर्थीक भुर्दंड अर्जदारांच्या माथी पडत आहे.
तसेच पोलीस भरती करिता आवश्यक असलेले कागदपत्रे ही ऑनलाईन बनवावी लागत असल्याने पोलीस भरतीच्या महाआयटी पोर्टलचा प्रभाव हा महाऑनलाईन पोर्टल वर सुद्धा होतांना दिसून येत असून महाऑनलाईन चे पोर्टल सुद्धा मंदावलेले बघावयास मिळत आहे त्यामुळे भावी पोलिसांना आपली कागदपत्रे तयार करण्यासाठी सुद्धा सेतु केंद्रात ताटकळत राहावे लागत आहे.

रोजगार नसल्याने अनेक नवयुवक व स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या पोलीस भरतीची जाहिरात प्रसिध्द झाल्याने आशा पल्लवीत झाल्या आहेत. मात्र सदर ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरीता येणाऱ्या अडथळयामुळे मात्र उमेदवारांमध्ये निराशा पहावयास मिळत आहे व अधिकचा आर्थिक भुर्दंड माथी बसत आहे. अर्ज सादर करण्यास आता केवळ काही दिवस उरले असतांना अशा प्रकारच्या अडथळयाने मात्र आपला अर्ज सादर करायचा तरी कसा ? आपला अर्ज ऑनलाईन सादर होणार काय नाही ? असा प्रश्न भावी पोलीसांना होत असून ऑनलाईन अर्ज प्रणालीमधील तांत्रीक अडचणी लवकरात लवकर दुर कराव्यात अशी सुध्दा मागणी भावी पोलीस करीत आहे.

#The Gadvishva #Police Recruitment #Gadchiroli Police #MahaIt #Mahaonline #Police Bharti 2022 #Technical Issue

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here