उद्या जोगीसाखरा येथे पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा

214

– इच्छूक उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, ७ डिसेंबर : पोलीस स्टेशन आरमोरी, ग्राम पंचायत जोगीसाखरा, गुरुदेव जंगल कामगार सोसायटी व राजपथ अकादमी आरमोरी यांच्या वतीने उद्या ८ डिसेंबर रोजी एकदिवसीय पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली असुन पोलीस भरतीसाठी इच्छूक उमेदवारांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच संदीप ठाकुर आणि जकासचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले आहे
या कार्यक्रमाचे उद्घाटन उपविभागीय पोलिस अधिकारी गडचिरोली प्रणिल गिल्डा यांच्या हस्ते‌ तर तहसिलदार कल्याणकुमार डाहट यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन विशेष अतिथी व मार्गदर्शक म्हणून पोलीस निरीक्षक आरमोरी मनोज काळबांडे आणि संचालक राजपथ अकादमी शशिकांत मडावी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच तज्ज्ञ प्रशिक्षकाचे शारीरिक व लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शन केले जाईल तरी पोलीस भरतीसाठी इच्छूक तरुण तरुणींनी कार्यशाळेत सहभागी होऊन मार्गदर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन सरपंच संदीप ठाकुर आणि जकासचे अध्यक्ष दिलीप घोडाम यांनी केले आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) ( Police pre-recruitment guidance workshop tomorrow at Jogisakhra) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here