The गडविश्व
ता.प्र. / आरमोरी, ७ डिसेंबर : तालुक्यातील ग्रा.पं. नरचुली येथे मंगळवार ६ डिसेंबर २०२२ रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित् महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमालाअर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी अध्यक्षा म्हणून सौ.पिंगला प्रकाश हलामी सरपंच उपाध्यक्ष, प्रभाकर पदा उपसरपंच, प्रभाकर हलामी सदस्य, रामदास अलाम, सौ.भाग्यश्री शेडमाके सौ.दिव्या सहारे, सौ.प्रेमीला कुमोठी, कु.रुपाली हलामी व सचिव नरेंद्र निमजे आणि कार्यालयातील कर्मचारी यांच्या प्रमुख उपस्थिती कार्यक्रम संपन्न झाला. तसेच आरमोरी तालुक्यातील विविध शासकीय निमशासकीय कार्यालये संस्था इत्यादी ठिकाणी महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवाला आदरांजली वाहण्यात आली.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (Armori) (Dr.Babasaheb Ambedkar)