मुरुमगाव येथे बिट स्तरीय क्रिडा स्पर्धा चे आयोजन

212

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०६ : तालुक्यातील मुरुमगाव येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली अतंर्गत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरुमगाव येथे ६ नोव्हेंबर २०२३ रोजी बिट स्तरीय क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
बिट स्तरीय कार्यक्रमाचे अध्यक्ष निरगंशाह मडावी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरुमगाव, कार्यक्रमाचे उदघाटक सरपंच शिवप्रसाद गवरना ग्रामपंचायत मुरुमगाव व प्रमुख अतिथि सौ.लताताई पूगांटे मुरुमगाव, पोलीस उपनिरीक्षक सचिन ठेगं पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, पोलीस उपनिरीक्षक राहूल चौधरी पोलीस मदत केन्द्र मुरुमगाव, मुख्याध्यापक सतीश सूरनकर दखने विद्यालय मुरुमगाव, वसंत कोलीयारा मुरुमगाव, वेले ERC प्रकल्प कार्यालय गडचिरोली, संदिप फड ERC गडचिरोली, शैलाताई कवाडकर, फगनीताई नौताम,महेश मडावी, मो.शरीफ भाई कुरैशी, अभिजीत मेश्राम ग्रामपंचायत सदस्य मुरुमगाव, मुख्याध्यापक बरडे आश्रमशाळा सावरगाव, आरोग्य सेवक शुभम उईके, बळीराम जाएभये, टि.आर. भोयर, कालिदास पोसरे, राहूल माडूलकर, नागेश निसार, जयश्री वासनिक, सचिव भालेकर, किरण काबळे आदि मान्यवर उपस्थित‌ होते.
तीन दिवस चालणाऱ्या बिटस्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय माध्यमिक आश्रम शाळा मुरुमगाव, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सावरगाव, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा रांगी, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा सोडे, शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा कंरडीमाल व अनुदानित आश्रम शाळा जपतलाई, मुरमाळी,आरमोरी असे एकूण नऊ शाळांनी सहभाग घेतला.
या उद्घाटन कार्यक्रमात सचिन ठेगं, राहूल चौधरी, लताताई पूगांटे, सरपंच शिवप्रसाद गवरना व निरगंशाह मडावी यांनी क्रिडा व क्रिडा स्पर्धा बद्दल मार्गदर्शन केले व विद्यार्थी व विद्यार्थिनी रंगारंग कार्यक्रम सादर करुन उत्साह वाढविला.
या उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन गूलाब हर्षे व आभार पेदापली मॅडम यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here