गडचिरोली जिल्ह्यात तीन दिवस पावसाचा ऑरेंज अलर्ट

1460
File Photo

– नागपूर विभागात इतरही ठिकाणी पावसाचा इशारा
The गडविश्व
गडचिरोली, २३ जून : पावसाळा ऋतू सुरू होऊनही उन्हाच्या झळा सोसत असतांना मात्र मागील एक दिवसापूर्वी पावसाने हजेरी लावत नागरिकांना गर्मीच्या उखाळ्यापासून सुटका मिळाली असून पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना सुद्धा काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तर आता नागपूर हवामान विभागाने आजपासून तीन दिवस गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला असून विजांच्या कडकडाटेसह मेगगर्जना व मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता तसेच नागरिकही वाढत्या उन्हामुळे त्रस्त झाले होते. मध्यंतरी हवामान विभागाने ऑरेंज, येलो अलर्ट जारी केला होता मात्र तो अंदाज खरा न ठरल्याने पाऊस पडेल की नाही या चिंतेत शेतकरी होता. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र पावसाचे आगमन झाल्याने दिलासा मिळालेला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार
नागपूर : २४, २४, २७ जून येलो तर २५ व २६ जून ऑरेंज अलर्ट.
वर्धा : २३,२४,२५ व २७ येलो तर २६ ला ऑरेंज अलर्ट.
भंडारा : २३ व २७ येलो तर २४ ते २६ जून ऑरेंज अलर्ट.
गोंदिया : २३ व २७ येलो तर २४ ते २६ जून ऑरेंज अलर्ट.
चंद्रपूर-गडचिरोली : २६ व २७ येलो तर २३ ते २५ ऑरेंज अलर्ट.
जारी करण्यात आला आहे.
( टीप : नागपूर हवामान विभागाने हा दर्शविलेला अंदाज आहे त्यामुळे यात कालांतराने बदलही होऊ शकतो) गडचिरोली जिल्हयात ऑरेंज अलर्ट असल्याने काही ठिकाणी वज्रघातासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून नागरिकांनी उचित काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

अशी घ्या काळजी

– आकाशात विजेचा कडकडाट/गडगडाट असतांना धातुजन्य वस्तू जवळ बाळगू नका.

– धातुजन्य खांब, वीज सुवाहक वस्तू जवळ राहू नका.

– विशेषतः उंच झाडापासून दूर रहावे.

– उंच ठिकाणी असल्यास तात्काळ सुरक्षित ठिकाणी यावे.

 पावसाची झालेली नोंद 

Dt. 23.06.2023
Dist. Gadchiroli
Talukawise avg Rainfall (in mm)
1. Gadchiroli : 9.2
2. Kurkheda : 3.9
3. Armori : 12.4
4. Chamorshi : 12.2
5. Sironcha : 39.5
6. Aheri : 13.6
7. Etapalli : 24.2
9. Dhanora : 20.6
9. Korchi : 37.8
10. Desaiganj : 2.2
11. Mulchera : 31.2
12. Bhamragad : 43.3
——
Dist avg : 20.9
——-
RF Counted Circles : 38/40
Highest RF Circle : Sironcha -80.0
Heavy RF Circles : 1
Sironcha – 80.1 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here