एटापल्ली तालुक्यातील आदिवासी अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी कडक कारवाई करा

247

– तहसीलदार धानोरा यांच्या मार्फत राज्यपालाना नारी शक्तीचे निवेदन
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २३ जून : एटापल्ली तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी राणी दुर्गावती आदिवासी नारी शक्ती संघटनेच्या वतीने तहसीलदार धानोरा यांच्या मार्फतीने महामहिम राज्यपाल यांना निवेदनातून करण्यात आलीय आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पीडीत १० जून २०२३ रोजी एटापल्लीच्या शाळेमध्ये टी.सी. आणायला गेली होती. शिक्षकांनी टी.सी. साठी नंतर येण्यास सांगितले असता ती परत जाण्यासाठी निघाली. परत जाताना उन्हाच्या तडाक्यामुळे तिला भोवळ आल्यासारखे वाटत होते. त्याच दरम्यान दोन युवक नेहाला शामसुंदर कुंभारे (२३) रा.जिमलगट्टा आणि रोशन विठ्ठल गोडसेलवार (२२) रा. आलापल्ली हे दोघे मिळून घरी सोडून देण्याच्या बहाण्याने तिला मित्राच्या रूमवर नेण्यात आले व तिला पिण्याच्या पाण्यामध्ये गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच अनैसर्गिक कृत्य करण्यात आले. ही अतिशय निंदनीय बाब असून अत्याचार करणारे नराधम हे विशिष्ट पक्षाशी संबंधित आहेत. तरी वरील विषयाची गंभीरपणे नोंद घेऊन पिडित आदिवासी अल्पवयीन मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी निवेदन सादर करीत असल्याचे म्हटले आहे.
सदर बाबीची दखल न घेतल्यास किंवा कारवाई न झाल्यास तालुका व जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात राणी दुर्गावती आदिवासी नारीशक्ती संघटनेद्वारे आंदोलन करण्याचा इशाराही राणी दुर्गावती आदिवासी नारी शक्ती संघटना धानोराच्या वतीने निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती शेवंता विष्णू हलामी, उपाध्यक्षा सौ. निराशा घनश्याम मडावी, सचिव सौ. मंगला जनार्दन मडावी, सहसचिव सौ.भुमाला गजानन परचाके, कोषाध्यक्ष सौ.पुणम पुरुषोत्तम किंरंगे, सदस्या सौ. गीता प्रेमलाल वाल्को, कार्याध्यक्ष सौ. मंगला विनोद कुंमरे, संघटीका सौ.भाविका निलेश मडावी, सदस्या सौ .देवला दीपक कुळमेथे, सौ अनिता वीरेंद्र तूमराम आदी उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli news updates, dhanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here