धानोरा ग्रामीण रुग्णालयात जागतिक योग दिन साजरा

235

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २३ जून : जागतिक योग दिनाचे औचित्य साधून आयुष विभाग तर्फे ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेश गजबे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सावसाकडे, डॉ. सीमा गेडाम, डॉ. मंजुषा उपस्थित होते.
योग प्रशिक्षक राऊत यांनी योग प्रात्यक्षिक व योगाचे फायदे सांगितले. डॉ. सीमा गेडाम यांनी मानवी जीवनातील योग प्राणायाम यांचे फायदे सांगितले. दैनंदिन व्यस्त जीवनशैलीमध्ये कमीत कमी ३० मिनिट रोज योगा करावा असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णालय धानोरा चे सर्व अधिकारी व कर्मचारी व रुग्ण उपस्थित होते.
(the gdv, the gadvishva, gadchiroli dhanora news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here