जिल्हा परीषद हायस्कूल धानोरा येथे योग दिन साजरा

165

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २३ जून : जिल्हा परीषद हायस्कूल धानोरा येथे आपल्या जीवनातील योगाचे महत्व पटवून देण्यासाठी आणि त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी “जागतिक योग दिन” साजरा करण्यात आला .
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पी. व्ही.साळवे, प्रमुख अतिथी पी.बी तोटावार, डॉ.रश्मी डोके, श्रीमती रेखा कोरवार मॅडम होत्या. याप्रसंगी साळवे यांनी योग दिन साजरा करण्याचा उद्देश, योग दिनाचे महत्व, योगाचे फायदे, यावर मार्गदर्शन केले. तोटावर यांनी प्राणायाम विविध आसने करून त्याचे महत्व सांगितले. यानंतर सर्वांनी विविध प्रकारची आसने करून योग दिन साजरा केला.
कार्यक्रमाचे संचालन हरीश पठाण सर तर आभार सहारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयराम कोरेटी यांनी परिश्रम घेतले.
(the gdv, the gadvishva, dhanora, gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here