मतदार नोंदणीची संधी! गडचिरोलीत चार दिवस विशेष शिबिरे; नवमतदार, महिला अन् दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर सुविधा

21

मतदार नोंदणीची संधी! गडचिरोलीत चार दिवस विशेष शिबिरे; नवमतदार, महिला अन् दिव्यांगांसाठी मतदान केंद्रांवर सुविधा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २१ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात 19, 20, 26 आणि 27 सप्टेंबर 2026 रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. नवमतदारांसह महिला आणि दिव्यांग नागरिकांनी या मोहिमेचा लाभ घेऊन मतदार यादीत आपले नाव नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.

तीन विधानसभा मतदारसंघांतील 963 मतदान केंद्रांवर शिबिरे

जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांवर ही विशेष शिबिरे घेण्यात येणार आहेत. 67-आरमोरी मतदारसंघातील 300, 68-गडचिरोलीतील 363 आणि 69-अहेरीतील 300 मतदान केंद्रांवर नागरिकांना मतदार नोंदणी व दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नवमतदारांसाठी विशेष भर

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत 31 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत नागरिकांकडून दावे व हरकती स्वीकारल्या जात आहेत. नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नाव किंवा इतर तपशीलांमध्ये दुरुस्ती तसेच पात्रतेनुसार नाव वगळण्यासंदर्भातील अर्जही स्वीकारले जाणार आहेत.
विशेषतः 18 ते 19 वर्षे वयोगटातील नवमतदारांची नोंदणी वाढविणे, तसेच महिला आणि दिव्यांग नागरिकांचा मतदार यादीतील सहभाग सुनिश्चित करण्यावर या विशेष मोहिमेत भर देण्यात आला आहे.
पात्र नागरिकांनी आपल्या संबंधित मतदान केंद्रावर जाऊन शिबिराचा लाभ घ्यावा आणि मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा इतर तपशीलांमध्ये काही दुरुस्ती आवश्यक असल्यास संबंधित अर्ज सादर करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here