धानोरा : अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक; ट्रॅक्टर जप्त

31

धानोरा : अवैध रेती वाहतुकीवर महसूल विभागाची धडक; ट्रॅक्टर जप्त
The गडविश्व
ता.प्र/ धानोरा, दि. २१ : तालुक्यातील कारवाफा परिसरात अवैधरीत्या रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाने धडक कारवाई करत ट्रॅक्टर जप्त केले. जप्त वाहन पुढील कायदेशीर कारवाईसाठी धानोरा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.
कारवाफा परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल पथकाने कारवाई करत रेतीची वाहतूक करणारे ट्रॅक्टर ताब्यात घेतले. जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर कारवाफा येथील रहिवासी रतन बहिरवार यांच्या मालकीचे असल्याची माहिती आहे.
ही कारवाई तहसीलदार गणेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईदरम्यान नायब तहसीलदार अल्पेश बारापात्रे, महसूल सहाय्यक साईनाथ कुमरे, ग्राम महसूल अधिकारी दिनेश पदा, राहुल आत्राम आणि दुर्गेश मडावी यांनी सहभाग घेतला.
महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. रेतीच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी यापुढेही कठोर कारवाई सुरू ठेवण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
#thegdv #thegadvishva #gadchirolinews #crimenews

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here