०८ मे रोजी ‘सर्च’ रुग्णालयात मुत्रविकार व त्वचाविकार ओपीडी

104

The गडविश्व
गडचिरोली, दि . ०२ : धानोरा तालुक्यातील चातगाव येथील सर्च रुग्णालयात बुधवार ०८ मे २०२४ रोजी मूत्रविकार व त्वचाविकार ओपीडीचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेषज्ञ ओपीडी करीता दत्ता मेघे हॉस्पिटल सावंगी, वर्धा येथील मुत्रविकार व त्वचाविकार विशेषज्ञ सर्च रुग्णालय चातगाव येथे रुग्णसेवा देण्या करीता येणार आहेत.
मूत्रविकार ओपीडी मध्ये मूत्राशयाचा कर्करोग, अंडाशयावर सूज, किडनी स्टोन, मूत्राशय पिशवी मध्ये स्टोन असणे, लघवीची नळी चिपकलेली असणे, मूत्राशय नळीमध्ये स्टोन अटकलेला असणे , प्रोटेस्ट ग्रंथीची वाढ होणे तसेच लघवीतून रक्त जाणे, लघवी अटकत/ थांबत येणे अशी लक्षणे असल्यास मूत्रविकार तज्ञांचे मार्गदर्शन व उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. तसेच शरीरावर पांढरा चट्टा कोड व खाज, मुरूम/ तारुण्यपिटिका, केस गळती, कोंडा होणे, गजकर्ण, खरूज, सोरायसिस, नखांचे आजार तसेच नागिन ही लक्षणे असल्यास त्वचाविकार ओपीडी मध्ये उपचार सुविधा उपलब्ध केली आहे. तरी या दोन्ही विशेषज्ञ ओपीडीमध्ये गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ करून घ्यावे, असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.
गडचिरोली जिल्हातील ग्रामीण व आदिवासी गरजू रुग्णांकरिता उत्कृष्ट दर्जाची आरोग्य सुविधा पुरविण्याच्या उद्देशाने सर्च रुग्णालय विशेष आर्थिक सुविधा देत आहे. ओपीडीमध्ये ईसीजी, एक्सरे व प्रयोगशाळा तपासणी तसेच डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांवर ५०% सवलत प्रदान करित आहे. तरी ०८ मे रोजी होणार्‍या वेदना व्यवस्थापन ओपिडीचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी करून घेण्याचे आवाहन सर्च रुग्णालयाने केले आहे. येताना आधारकार्ड व रेशन कार्ड सोबत घेऊन यावे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here