The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, दि, ०८ : तालुक्यातील विविध समस्यांना घेऊन तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ७ नोव्हेंबर ला तहसील कार्यालयावर बैलबंडीसह धडक मोर्चा काढण्यात आला.
कृषी पंपाचे भार नियमन बंद करून आठ तासाऐवजी सोळा तास (दिवसा) वीज पुरवठा व्हावा, डोंगरगांव ठाणेगांव उपसा सिंचन योजनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी, आधारभूत धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावेत, आरमोरी शहरातील हद्द वाढ झालेल्या जमिनीची अखीव पत्रिका भोगवटाधारकाच्या नावे देण्यात यावी, पी एम किसान योजनेअंतर्गत प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करून त्वरित लाभ देण्यात यावा, पिक विम्याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांना देण्यात यावी, सरसकट दुष्काळ जाहीर करावा, जंगली प्राण्यांमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विशेष पीक विमा योजना लागू करावी तसेच जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा, घरगुती वापरातील गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, व अन्य वस्तूंच्या भरमसाठ वाढलेल्या किंमती कमी कराव्यात, बेरोजगार युवकांना रोजगार देण्यात यावा, जातनिहाय जनगणना करून मागासवर्गीयांना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लागू करावे, कृषी पंपाचे अवास्तव बिल कमी करण्यात यावेत इत्यादी मागण्या संदर्भात मोर्चा काढण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान, माजी आम. आनंदराव गेडाम, प्रदेश काँग्रेस सचिव डॉ. नितीन कोडवते, जि. प. माजी उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, नंदू नरोटे, गडचिरोली गडचिरोली तालुकाध्यक्ष वसंत राऊत, किसान काँग्रेस अध्यक्ष वामन सावसाकडे, ओबीसी सेल अध्यक्ष भूपेश कोलते, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, आदिवासी सेल अध्यक्ष छगन शेडमाके, काँग्रेस नेते हरबाजी मोरे, शालिक पत्रे, विजय सूपारे, स्वप्नील ताडाम, विश्वेश्वर दरो, केतुजी गेडाम, दत्तू सोमंनकर, अनिल किरमे, तारकेश्वर धाइत, पिंकू बावणे, अनुसूचित जाती महिला अध्यक्ष वृंद्धाताई गजभिये, रोशनी बैस, लोणारे ताई, सह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी, महिला भगिनीं उपस्थित होते.