– उपोषणाच्या चौथ्या दिवश अधिकारी येऊन आल्या पावली परतले
The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, दि. २९ : मागिल १५ दिवसांपुर्वी शेतकऱ्याना रब्बी पिकाला सुरळित पाणिपुरवठा व्हावा यासाठी महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यानी १२ तास कृषी पंपांना विजपुरवठ्याचे आश्वासन दिल्याप्रमाणे ते पुर्ण करावे यासाठी देसाईगंज तालुक्यातील कृषी पंपधारकांनी आंदोलन उभारले होते. तेव्हा स्थानिक आमदारांनी चर्चा करुन तीन दिवसात आरमोरी विधानसभा क्षेत्रासह गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुरळित विज पुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली परंतु तब्बल १५ दिवस उलटुनही विजपुरवठा होत नसल्याने पिक धोक्यात आल्याने शेकडो भुमिपुत्रांणी रामदास मसराम यांच्या नेतृत्वात देसाईगंजच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चाच्या माध्यमातुन धडक दिली. शेतकऱ्यांना मागण्या पुर्ण होईपर्यंत आमरण उपोषणाची सुरुवात कोरेगावचे शेतकरी श्याम मस्के पाटिल यांनी केली. या उपोषणाचा चौथा दिवस सुरू असून आज महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनीचे उपविभागीय अभियंता अमर लिखार व नायब तहसीलदार बोडे व सहकारी यांच्या मदतीने उपस्थित उपोषण सोडण्यासाठी प्रयत्न केला परंतु या अधिकाऱ्याची चर्चा निष्फळ होऊन जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही असे शामराव मस्के व शेतकऱ्यांनी भूमिका घेतली. यामध्ये मुख्य मागणी शेतीला बारा तास सुरळीत वीजपुरवठा करावा ही असून उर्वरित मागण्या ची पूर्तता झाल्याची लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे.यावेळी तालुक्यातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
निसर्गाशी नेहमीच दोन हात करित शेतकरी शेतात पिक उभारत असतो. आपल्या कुटुंबाच्या पोटाची खडगी भागविण्यासाठी कधी तुडतुडा कधी रानटी जनावरांच्या हैदोसांवर मात करत शेतकरी शेतात पिक उभे करतो, कालव्याच्या सिंचनाची सोय नसलेले शेतकरी कृषी पंपाच्या माध्यमातुन रब्बी पिकाची लागवड करतात, मागिल दोन वर्षापासुन देसाईगंज तालुक्यात कृषिपंपांना विजपुरवठ्याचा प्रश्न सातत्याने निर्माण झाला असुन सुरळित पाणिपुरवठा होत नसल्याने धान पिक धोक्यात येवुन करपण्याच्या मार्गावर लागले आहे. या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी १५ दिवसापुर्वी रामदास मसराम यांनी शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेवुन देसाईगंजच्या विद्युत विभागाच्या कार्यालयाला घेराव केल्याने शेतकऱ्यांनवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परिस्थितीचे गांभिर्य ओळखुन स्थानिक आमदार कृष्णा गजबे यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा उर्जामंत्री देवेंद्र फडणविस यांच्याशी चर्चा करुन तिन दिवसात संपुर्ण गडचिरोली जिल्ह्यातिल कृषीपंपधारक शेतकऱ्यांना १२ तास सुरळीत विजपुरवठा केला जाईल अशी ग्वाही दिली. मात्र १५ दिवस उलटुनही विद्युत विभागाकडुन कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. सद्या रब्बी पिकांच्या रोवणी चे काम जोरात सुरु असुन कृषिपंपधारक शेतकऱ्यांच्या शेतात मात्र भेगा पडल्या असुन धान पिक धोक्यात आल्याने भुमिपुत्र असलेल्या रामदास मसराम यांच्या नेतृत्वात चोप, कोरेगांव, बोळधा, पोटगाव शंकरपुर, विहिरगांव, किन्हाळा, मोहटोला आणि देसाईगंज तालुक्यातिल सर्वच कृषिपंपधारक शेकडो शेतकऱ्यांनी उपविभागिय कार्यालयावर मोर्चा काढुन ठिय्या आंदोलन उभारले. एवढेच नव्हे तर कोरेगांव चे शेतकरी श्याम मस्के यांनी कार्यालयाच्या सामोर शेतकऱ्यांच्या मागण्या पुर्ण करण्याचे शासनासमोर आव्हान उभे करुन आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी सुद्धा मागणी पूर्ण झाली नाही.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या
कृषी पंपांना सुरळित विद्युत पुरवठ्याच्या आश्वासनानुसारच शेतकऱ्यांनी रब्बी पिकाची लागवड केली. १५ दिवस उलटुनही शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर शासन व प्रशासन गांभिर्याने विचार करत नाही, पिक नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल होईल, आत्महत्येचे प्रमाण वाढतिल, शेतकऱ्यांना आर्थिक अडचणिंचा सामना करावा लागेल यासाठी उपाययोजना म्हणून शेतकऱ्यांना २४ तास विजपुरवठ्याची सोय उपलब्ध करुन देण्यात यावी, शासकीय धान खरेदी केंद्रावर हेक्टरी ५० क्विंटल धान शेतकऱ्यांकडुन खरेदी करण्यात यावा, आधारभुत धान खरेदी ३५०० रुपये प्रति क्विंटल प्रमाणे करण्यात यावी आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामिण भागात विज पुरवठा करणाऱ्या शंकरपुर पॉवर ट्रान्सफार्मर वर ५ एमव्हिए ऐवजी १५ एमव्हिए चा ट्रान्सफार्मर लावण्यात यावा. या सर्व मागण्या पुर्ण होईपर्यंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून कोरेगांव चे श्याम मस्के पाटिल यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शासन व प्रशासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा शेतकऱ्यांच्या संयमाचा सत्ताधाऱ्यानी अंत पाहु नये असा सज्जड इशारा या प्रसंगी रामदास मसराम यांनी दिला.