– मुरुमगाव ग्रामपंचायतच्या वतीने निवेदनातून मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. २९ : तालुक्यातील मुरुमगाव परिसरात अवैध दारू विक्री सुरू असून ती त्वरित बंद करण्यासाठी ग्रामपंचायत मुरुमगावच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार २८ फेब्रुवारी रोजी पोलीस मदत केंद्र मुरुमगाव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली.
धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिसर अतिसंवेदनशील आहे. तसेच परिसरातील अनेक लोक दारुच्या आहारी गेल्याने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेली पहायला मिळतात. दारूचा विपरीत परिणाम महिलांना भोगावे लागत आहे. यासाठि मागील काळात ग्रामसभेच्या माध्यमातून गावातील संपूर्ण दारू बंदी करण्यात आली होती. परंतू काही सुशिक्षित लोकांनी पून्हा देशी विदेशी दारू अवैध स्वरूपात विकण्याचा व्यवसाय सूरू ठेवलेला आहे. या पूर्वी ग्रामपंचायत कडून पोलीस मदत केंद्र मुरुमगाव ला दारू विक्री बंद करून विक्रेत्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले होते. परंतु पोलीस मदत केंद्र मुरुमगाव तर्फे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. पोलिस मदत केंद्राच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मुरुमगाव येथे अवैध रित्या ने देशी विदेशी दारू विकण्याचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप गावकरी करताना दिसतात.
म्हणून ग्रामसभा ग्रामपंचायत मुरुमगाव तर्फे पुन्हा अवैध दारू विक्रेत्यांची योग्य आणि सखोल चौकशी करून दारूबंदीसाठी मुरुमगाव पोलीस मदत केंद्राने सहकार्य करावे याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे. तसेच मुरुमगाव ग्रामपंचायत ला लागूनच असलेल्या ग्रामपंचायत हिरंगे अंतर्गत रेगेंगाव येथे सुद्धा मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री सूरू असल्याने सबंधित विभाने लक्ष देवून कारवाई करने गरजेचे आहे. तसेच छत्तीसगढ राज्याच्या सिमेला लागूनच सावरगाव, गजामेढी, कूलभटी व छत्तीसगढ राज्यातील कोहका फाट्यावर पूर्वी देशी व विदेशी दारू विकण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात होते ते सर्व गावातच विकल्या जात असल्याने शिकण्याचे वय असलेले १५ वर्ष वयोगटातील मुले मादक द्रव्यांच्या आहारी जाताना दिसतात. ज्या मुलांच्या हातात शिक्षणाचे पुस्तके पाहिजेत त्याच्या हातात दारूच्या बाटल्या आढळून येतात. शेकडो मुलांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा होताना दिसतो.
निवेदन देतांना ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.