The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ६ मे : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगाव येथे आज ६ मे २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याच दिनाचे औचित्य साधून विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
आजादी का अमृत महोत्सव वर्षा निमित्त येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांना आज मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित आले.
छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शाळेचे मुख्याध्यापक गोपाल राऊत, प्रमुख अतिथी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य चापडे, दिवाकर भोयर सहायक शिक्षक, संदीप नागदेवते, राजगडे मॅडम, पदा सर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालक नाकाडे मॅडम यांनी केले तर आभार कोल्हे यांनी मानले.
(the gdv) (the gadvishva) (gadchiroli dhanora nimgao)