धानोरा : दुचाकीची झाडाला धडक, एकजण ठार

1320

The गडविश्व
ता.प्र / धानोरा, ७ मे : तालुक्यातील धानोरा ते रांगी मार्गावरील पुसावंडी गावानजीक दुचाकीची झाडाला धडक बसून झालेल्या अपघातात एकजण ठार झाल्याची घटना रविवार ७ मे रोजी सकाळच्या सुमारास घडली. शमी शेख रा.धानोरा असे अपघातील मृतकाचे नाव आहे.
प्राप्त महितीनुसार, धानोरा ते रांगी मार्गाने मृतक हे सकाळच्या सुमारास दुचाकीने प्रवास करीत होते दरम्यान पुसावंडी गावानजीक दुचाकीचे नियंत्रण बिघडल्याने दुचाकीची झाडाला जबर धडक बसली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र सदर रस्त्याने सकाळच्या सुमारास कोणतेही वाहन जात नसल्याने ते घटनास्थळावर अधिक वेळ पडूनच असल्याने कोणतीही मदत मिळू शकली नाही त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

हेल्मेट असता तर वाचला असता जीव

मृतक शमी शेख यांचा अपघात झाला तेव्हा त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांनी हेल्मेट घातले असते तर डोक्याला मार लागला नसता व त्यांचा जीव पण गेला नसता. हेल्मेट वापरने हे आपल्या सुरक्षितते साठी आहे सर्वांनी दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर केला पाहीजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here