निमनवाडा गटग्रामपंचायत टि.बि.मुक्त ग्रामपंचायत अभियान पुरस्काराने सन्मानित

152

The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. ०१ : तालुक्यातील निमनवाडा गटग्रामपंचायत टि.बि.मुक्त ग्रामपंचायत अभियान पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात टिबि मुक्त गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतुन टि.बि मुक्त अभियान राबविण्यात आले होते. त्यात धानोरा तालुक्यातील चिंगलि, दराची आणि कुथेगाव या ग्रामपंचायती क्षयरोग मुक्त झाल्या आहेत. या गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. प्रताप शिंदे जिल्हा आरोग्य अधिकारी गडचिरोली , होते तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. माधुरी किलनाके जिल्हा शल्य चिकित्सक गडचिरोली, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमित साळवे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. पंकज हेमके, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. डोलारे गडचिरोली, वैद्यकीय अधिकारी डॉ.उपलेंचवार, आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत स्तरावर झालेल्या सर्वे मधे निमनवाडा गटग्रामपंचायत मधे टि.बि.चा एकही रुग्ण मिळालेला नाही. गडचिरोली येथे पार पडलेल्या कार्यक्रमात हा सन्मान निमनवाडा येथील उपसरपंच चेतन सुरपाम यांनी हा गौरव स्वीकारला. यावेळी निमगाव येथिल परिचारिका निकुरे सिस्टर, आशा वर्कर ,गयाबाई खोब्रागडे आणि प्रतिष्ठित नागरिक राजु वरखडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ.सचिन हेमके, संचालन राजेश खडसे समन्वयक यांनी केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #dhanora )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here