मुक्तीपथचा प्रश्नमंजुषा स्पर्धा : तालुकास्तरावर उराडी जि.प शाळा ठरली अव्वल

234

-मुक्तीपथचा प्रश्नमंजुषा स्पर्धा-विचार कार्यक्रम
The गडविश्व
गडचिरोली, १४ फेब्रुवारी : कुरखेडा तालुका गट साधन केंद्र येथे मुक्तीपथ तर्फे दारू-तंबाखू मुक्तशाळा तालुकास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली. यात जिप उच्च प्राथमिक शाळा उराडी अव्वल तर द्वितीय क्रमांक जि.प. उच्च प्राथमिक शाळा गुरुनोली या शाळेने पटकाविला.
येणारी पिढी व्यसनमुक्त व्हावी, विद्यार्थ्यांना व्यसन लागू नये, विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम कळावे या उद्देशाने मुक्तीपथ अभियानाच्या वतीने जिल्हाभरातील शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. त्यांनतर विविध केंद्रावर ही स्पर्धा पार पडली. कुरखेडा तालुक्यातील तीन केंद्रस्तरावर यशस्वी ठरलेल्या सहा शाळांची तालुका स्तरावर निवड करण्यात आली. यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कुरखेडा, जांभूळखेडा, गुरुनोली, वडेगाव, भगवानपूर व उराडी या शाळांचा समावेश होता.
दरम्यान, या उपक्रमात विद्यार्थ्यांनी बनवून आणलेल्या व्यसन विरोधी प्रकल्पाच्या माध्यमातून उत्कृष्ट असे सादरीकरण केले. परीक्षक वैभव गिनगुले व गांधी फेलोचे ज्ञानेश्वर कल्यमकर यांनी स्पर्धेत प्रथम क्रमांक जिप. उच्च प्राथमिक शाळा उराडी तर द्वितीय क्रमांक गुरुनोली येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेला दिला. यावेळी गट साधन केंद्र येथील खुशाल बोक्करवार, कैलास जगणे, डी. एन. भरणे, सापळे, पटले , KP फाउंडेशनचे शुभम पोकळे, सलोनी ठाकुर, दीपाली बांगरे, मुक्तीपथ तर्फे मयूर राऊत, विनोद पांडे, कान्होपात्रा राऊत आदी उपस्थित होते.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here