कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा येथील ४ विद्यार्थिनींचे NMMS परीक्षेत सुयश

954

The गडविश्व
प्रतिनिधी /अमिर्झा, १४ फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत २१ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना ( NMMS) परीक्षेचा निकाल नुकताच १० फेब्रुवारी या जाहीर करण्यात आला असून गडचिरोली तालुक्यातील कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा येथील ४ विद्यार्थ्यांनींनी घवघवीत यश संपादन केले आहेत.
त्यामध्ये कु. समिक्षा भुपाल जांभुळकर, कु. लुकेश्वरी जांभुळकर, कु. संचिता राजेश जांभुळकर, कु. माहेश्वरी शामकांत गेडाम या ४ विद्यार्थीनींनी एन.एम.एम.एस. परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले. त्यांच्या यशाबद्दल गोंडवन विकास संस्थेचे सचिव रविंद्र जनवार, अध्यक्ष राजाभाऊ देशपांडे, तसेच कर्मवीर विद्यालय तथा कला कनिष्ठ महाविद्यालय अमिर्झा येथील मुख्याध्यापक राजकुमार शेंडे तसेच समस्त कर्मचारी वृंद यांनी विद्यार्थ्यांनींचे व मार्गदर्शक शिक्षक नागापुरे,तारगे, फुंडे, अमृतकर यांचे अभिनंदन केले.
सन २००७-०८ पासून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) ही मानव संसाधन विकास मंत्रालय नवी दिल्ली यांचे मार्फत राबविली जात आहे. आर्थिक मागास विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या प्रज्ञेची जोपासना, तसेच त्यांचे १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण व्हावे हा या योजनेचा गाभा आहे. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना दरमहा शिष्यवत्तीच्या स्वरुपात आर्थिक मदत करण्यात येते. सदर शिष्यवृत्ती १२ वी पर्यंत मिळते. सन २०१७-१८ पासून शिष्यवृत्तीचा दर दरमहा रु. १,०००/- ( वार्षिक रु. १२,०००/-) आहे. इ. ८ वी तील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उपन्न रु. ३,५०,०००/- पेक्षा कमी आहे व जे विद्यार्थी अनुदानित शाळेत शिकत असतात त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप होते.

निकाल बघण्याकरिता क्लिक करा : www.mscepune.in

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United) (NMMS Exam Result) (Amirza)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here