आ.विजय वडेट्टीवार यांची राज्याच्या विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी

915

The गडविश्व
गडचिरोली, १ ऑगस्ट : महाविकास आघाडी मधून अजित पवार शिंदे फडणवीस सरकार मध्ये सामील झाल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त होते. आता काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्ष नेतेपदी वर्णी लागली आहे.
विधानसभेच्या विरोधी पक्ष नेते पदाची जागा रिक्त होती. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. मात्र नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असे सूत्र आहे त्यानुसार महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले असून आमदार विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असतील असा काँग्रेसने निर्णय घेतला आहे. विधान परिषदेत आमदार सत्यजित तांबे यांनी याबाबत ट्वीट करून ही माहिती दिली आहे. मात्र याबाबत काँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here