मनोहर तुळशीराम पाटील पोरेटी एक अनमोल हिरा

342

धानोरा तालुक्यातील जांगदा पो. मोहली या गावी पाटील घराण्यात जन्माला आलेले. जन्मतः राजकारणाचा वारसा असलेले एक समाजसेवक राजकारणी लोकनेते, समाजसेवा सेवेची आवड असलेले गाव गाड्यातील सामाजिक कार्यक्रमाचे नेतृत्व करीत आज जनसामान्यांच्या गळ्यातल्या ताईत बनुन समाजसेवेचा वारसा जपणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजेच मनोहर पाटील तुळशीराम पोरेटी.
मुक्काम जांगदा, पोस्ट. मोहली, तालुका.धानोरा, जिल्हा. गडचिरोली या आदिवासी बहुल गावात लहानपणापासून विद्यार्थी दशेत असताना विविध संघटनांचे नेतृत्व करीत खरी समाजसेवेची भावना जोपासत जनतेतून मिळालेली पहिली संधी ती म्हणजे जांगदा ग्रामपंचायतचे सरपंच पद. एकदा सरपंच पदाची जबाबदारी खांद्यावर बसली तोच गावातील जनतेने एकदम डोक्यावर घेतले व पुन्हा दुसऱ्यांदा सरपंच पद मिळाले. सोबत मिळाले ते महत्त्वाचे पद म्हणजे आ.वि.का.चे अध्यक्ष, इतक्यातच न थांबता सरसकट परिसरातील लोकांचा मनोहरभाऊ वर असलेला विश्वास आणि त्यांच्या समाजकार्याची दखल घेत त्यांचा राजकारणातला खडतर प्रवास एकदम सोपा झाला आणि पुन्हा संधी मिळाली पंचायत समिती सदस्य पदाची, पुढे प्रवास सरसकट चालू राहिला. मनोहरभाऊंची सामाजिक दायित्वाची भावना खोलवर पोहोचली आणि जिल्हा परिषद सदस्य पदावर निवडून आले. दहा वर्षे सदस्यपद भूषविल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद उपाध्यक्षच्या खुर्चीवर विराजमान झाले. आदिवासी भागात असलेल्या शिक्षणाच्या समस्या असोत की आरोग्याच्या, सगळ्या शांत व संयम राखून निकाली काढल्या, परिसरातील नागरिकांच्या घरगुती किंवा सामाजिक, आर्थिक, मार्मिक किंवा धार्मिक असो सगळ्या समस्याचे निराकरण करण्याचे जणू पुण्यच मनोहरभाऊंनी केले. आजही जनतेचा असलेला विश्वास आणि भाऊंचे आपुलकीचे वागणे, याचे प्रत्यक्ष दर्शन मनोहरभाऊ पोरेटी यांच्या रूपात दिसून येत आहे. राजकारणाचा वारसा व समाजसेवेची ओढ असलेले पिताश्री तुळशीराम पाटील पोरेटी यांनी राजमाता जिजाऊंनी, शिवाजी महाराजांना द्यावी अशी शिकवण मनोहरभाऊंना दिली. त्यांचीच ही पावती मनोहर भाऊंच्या रूपात जनसामान्यात दिसत आहे. दिवाळीच्या शुभेच्छा संदेश मनोहरभाऊ पोरेटी कडून क्षेत्रातील नागरिकांसाठी.
धन्यवाद
सदर लेख नरेश ढोरे यांनी शब्दबद्ध केलेला आहे…. धन्यवाद!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here