आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते कोरेगाव येथे मका ऑनलाईन नोंदणीचा शुभारंभ

196

The गडविश्व
ता.प्र / देसाईगंज, १३ मे : तालुक्यात यावर्षी विद्युत टंचाई अभावी मक्याची लागवड ७० टक्के शेतकऱ्यांनी केली होती. परंतु तालुक्यात मात्र शासकीय मका खरेदी केंद्र नसल्याने व्यापारी बेभाव मकाची खरेदी केली जात होती. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला होता. याविषयीची मागणी आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली असता त्या मागणीला सतत आमदार गजबे यांनी पाठपुरावा करून देसाईगंज तालुक्यात राष्ट्रसेवक बहुउद्देशीय सेवा केंद्रांना मका खरेदीची परवानगी मिळाली असून, ऑनलाईन नोंदणी शुभारंभ आज आमदार कृष्णा गजबे यांचे हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे, विसोरा येथील माजी सरपंच नितीन बनसोड, संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुर्जेकर, अनिल मस्के, पत्रकार अरुण राजगिरे, गौरव नागपूरकर, शुभम नागपूरकर, संस्थेचे सचिव विशाल कुर्जेकर व शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here