The गडविश्व
गडचिरोली, १४ मे : रांगी केंद्राच्या वतीने केंद्रातील संपूर्ण १३ ही शाळेत विविध उपक्रम, व स्पर्धा घेत गुणवंतांना शैक्षणिक साहित्याचे वाटप रांगी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार यांच्या माध्यमातून करण्यात आले.
छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथी निमित्य व शालेय सत्राच्या अखेरच्या दिवशी निकाल सोबतच केंद्रातील १३ ही शाळेतील प्रत्येकी उत्कृष्ट ठरलेल्या ३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप शाळास्तरावर मुख्याध्यापक यांचे हस्ते करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचाली करता शुभेच्छा देण्यात आल्या.
शैक्षणिक सत्र २०२२-२३ मध्ये रांगी केंद्राचे केंद्रप्रमुख देवेंद्र लांजेवार यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण रांगी केंद्रातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होण्यासोबतच त्यांच्यात अभ्यासाची आवड निर्माण व्हावी, प्रत्येक मुलांना समान संधी मिळावी व त्यांच्यातील न्यूनगंड कमी करून एकमेकांना सहकार्य करून त्याचे शिक्षण व्हावे सोबतच त्यांच्यामध्ये असलेल्या कलात्मकतेला वाव मिळावा व शैक्षणिक दर्जा वाढावा सोबतच आदर्श नागरिक तयार होण्याकरिता विविध गुण जोपासणे व गुणवत्ता वाढीकरिता केंद्रातील संपूर्ण शाळेमध्ये विविध उपक्रम राबविले गेले. त्यात स्वच्छतेचा शनिवार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा तसेच शालेय स्पर्धा चे आयोजन रांगी केंद्रातील संपूर्ण १३ ही शाळात करण्यात आले. या सर्व उपक्रमात व वार्षिक अभ्यासामध्ये चाचणी अंती जे विद्यार्थी गुणवंत झाले अशा संपूर्ण गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर उपक्रमाला आवश्यक सर्व शैक्षणिक साहित्य केंद्रप्रमुख देवेन्द्र लांजेवार यांचे कडून पुरविण्यात आले.