गडचिरोली : शहरातील घरांसमोरही अतिक्रमण, नप कारवाई करणार काय ?

796

– कुठे पक्के शेड तर कुठे इमारती आल्या रस्त्यावर
The गडविश्व
गडचिरोली, १३ मे : शहरातील अतिक्रमण हटविण्याची मोहीम नगर परिषदेमार्फत राबविण्यात येत आहे. रस्त्यालगत असलेले व नप च्या हद्दीत असलेले अतिक्रमण हटविण्यात येत आहे मात्र शहरातील घरासमोरही अतिक्रमण असून घरासमोर कुठे पक्के शेड तर कुठे इमारती रस्त्यावर आल्या असल्याने त्यावर नगर परिषद कारवाई करणार काय ? असा सवाल उपस्थित होत आहे.
गडचिरोली शहरात वाढते अतिक्रमण व होत असलेल्या अपघातांची मालिका बघता नगर परिषदेमार्फत अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. मुख्य मार्गालगत असलेल्या अतिक्रमनावर नप द्वारे बुडोजर चालविण्यात येत आहे मात्र शहरातील अंतर्गत भागात नप ने निरीक्षण केल्यास अनेक घरासमोर पक्के शेड तर काही घरे, इमारती रस्त्यावर आल्याचे निदर्शनास येतील.रस्त्यावर घरे येत असल्याने व पक्के शेड तयार करत असल्याने रस्ते लहान होत चालल्याने रहदारी करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे नप शहरातील यासुद्धा अतिक्रमनावर बुलडोजर चालवणार काय ? कि लहाण्यांना क्षय आणि मोठ्यांना अभय ? असा दुजाभाव नप कडून करण्यात येणार काय असे विविध प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.
नगर परिषद अतिक्रमन हटाव मोहिमेत दुजाभाव करणार की सरसकट अतिक्रमनावर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

(the gdv, the gadvishva, gadchiroli atikraman, nagar parishad gadchiroli)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here